Ruth 4

1आता बवाज वेशीत जाऊन बसला. आणि इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला. तेव्हा हा त्याला म्हणाला, येथे येऊन बस. तोसुद्धा तेथे जाऊन बसला. 2आणि गावातील दहा वडिल पुरुषास बोलावले आणि म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा. आणि तोसुद्धा बसला.

3मग तो त्या जवळच्या नातलगास म्हणाला, मवाब देशातून नामी आली आहे. ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे. 4आणि तुला हे कळवावे, आणि येथे या बसलेल्यासमोर आणि माझ्या वडिलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, आणि तुझ्यानंतर मी आहे. तो म्हणाला, मी खंडून घेईल.

5मग बवाज म्हणाला ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्यादिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे. 6आणि तो जवळचा नातलग म्हणाला, माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही. सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल. म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.

7वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात एक पध्दत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्यास देत असे. 8तो जवळचा नातलग बवाजास म्हणाला, तूच ते विकत घे. आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.

9आणि बवाज त्या वडिल जनास व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. 10याखेरीज महलोनाची स्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून तिचा स्विकार करतो. ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये.

11तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडिल जन म्हणाले, आम्ही साक्षी आहो, ही जी स्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ प्रमाणे करो. एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमांत कीर्ती होवो. 12आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान येईल त्याच्याद्वारे होवो.

13मग बवाजाने रूथेशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. 14तेव्हा तेथील नामीस म्हणाल्या, परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही. आणि त्याचे नाव इस्राएलात प्रसिध्द होवो. 15आणि तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृध्दपणी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीति करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.

16तेव्हा नामीने ते बालक घेतले, आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली. 17आणि नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणीनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.

18आता ही पेरेशाची वंशावळ आहे. पेरेस हेस्रोनाचा पिता झाला, 19हेस्रोन रामचा पिता झाला आणि राम अम्मीनादाबाचा पिता झाला, 20आणि अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला आणि नहशोन सल्मोनाचा पिता झाला, 21आणि सल्मोन बवाजाचा पिता झाला आणि बवाज ओबेदाचा पिता झाला 22ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दावीदाचा पिता झाला.

Copyright information for MarULB